Monday, May 22, 2023

वालचंदमधले ते शेवटचे क्षण...

        दिवस - ३०-३१ मे असावा. वेळ - दुपारी ३.४५ च्या आसपासची. स्थळ- वालचंद मधली कुठलीशी एक क्लासरूम, ANN (Artificial Neural Network)चा इंजिनीरिंग जीवनातला शेवटचा पेपर लिहित होतो. क्लासरूम ऑलरेडी अर्ध्याहून रिकामी झालेली. घड्याळाचा मिनिट काटा १२कडे जाऊ लागला तसा बाहेर कल्ला वाढू लागला. आता राहवेना.. येत होतं सगळं लिहून झालं होतं. आता योग्या,  सल्लू, विप्ल्या, सुह्या, प्रण्या, शोएब्या, शिशिऱ्या, मी ..सगळ्यांची एकमेकांना खुणवाखुणवी झाली आणि पेपर जमा करून आम्हीही निघालो…त्या कल्ल्यात सामील व्हायला..मह्या, सुम्या, अभ्या, स्वप्न्या, गजा, सुशा आणि बाकी सगळी उरलेली बाकी वर्गातली गॅंग होतीच…व्हरांड्यात एरव्ही परीक्षेच्या काळात दिसणारे Tensed चेहरे.. आज कुणालाही न जुमानता अक्षरशः धावत पळत बाहेरच्या दिशेने सुटले…


      बाहेर लायब्ररीपाशी आख्खा गाव गोळा झाला होता. फुल्ल टू गोंधळ नुसता…प्रण्याने आज चांगलं काम केलं होतं, कॅमेरा आणला होता. तो हे सारे क्षण टिपत होता. तोपर्यंत सगळे मामा(सिक्युरिटी) दिसायला लागले. पण तेही भलत्याच मूडमध्ये दिसत होते, हसत-हसतच पिटाळायचं नाटक करत होते जणू..त्यांनाही माहीत होतं, उद्यापासून हि ब्याद/जनता नसणारे…    
इतक्यात कुणीतरी सुतळी बॉम्ब काढले आणि पाहता-पाहता लावलेच...थोडी गर्दी पांगली..
फटाकडे वाजून झाले कि परत आवाज वाढले... बेफाम होऊन अगदी...गप्पा, गळाभेटी सुरु होत्या...आणि मघाचे बेंबीच्या देठापासून ओरडणारेच...क्षणात आता मवाळ झाले.. पापण्या अगदी दिसत नसल्या तरी ओल्या होत गेल्या...उद्यानंतरचा विचार...कुणाला जॉब लागलेले, कुणाला शोधायला सुरुवात करावी लागणार होती...काहींचे पुढच्या शिक्षणाचे प्लॅन्स त्या दिशेने सुरुवात करायची होती...ह्याची जाणीव झाली असावी...पण हा दिवस... हि जागा..हि माणसं...आपली माणसं...काही होऊ न शकलेली..पण रोजच्या भेटीतली  ..आज शेवटची भेटतायत...at least काही दिवसांसाठी का होईना... 

      





              तसाच तिथे तासभर होत आला..कट्टा मोकळा होऊ लागला. सर्वानुमते पावलं मंजूच्या गाड्याकडे वळली…नेहमीप्रमाणे चहा-पोहे .. भजीच्या ऑर्डरी गेल्या. आज लगेचच माघारी निघालो. जसजसं कॉलेज जवळ जाऊ लागलो, मोकळ्या झालेल्या कॅम्पसमुळे… क्षणात कोलाहलातून बदललेल्या शांततेमुळे .. पोटात खड्डा पडू लागला..पाय निघत नव्हता पण तसंच आवंढा गिळत बाप्पाच्या मंदिरात पाया पडून होस्टेलकडे निघालो. 




    आमच्या D7 कडे वळलो..पाहतो तर काय .. submission पेपर, Xeroxचा नुसता खच पडला होता. स्पीकर वर गाण्यांचा दणदणाट सुरु होता. तो दिवस तसाच संपला बहुतेक..रात्रीचं फार काही आठवतही नाही. 




     

                                                  मनात चलबिचल सुरु होती.. धाकधूक..  बैचेन होत होतं.. कॉलेज लाईफ संपली होती...पुन्हा एकदा Comfort झोनबाहेर पडणार होतो.. आता बाहेरच्या दुनियादारीशी थेट संबंध येणार...पहिल्यांदा घराबाहेर-बारामतीबाहेर शिकायला बाहेर पडलेलो मी..घरच्यांपासून दूर... सुनीलदादासोबत सांगलीला ऍडमिशन आलेलो.. भर पावसाळा...जुलै महिना.. CAP फॉर्म्स भरताना मिळून TCच्या आम्हा काही मित्रांनी 'वालचंद'चे ऑपशन्स टाकलेले.. काहींना मिळालं नाही..काहींना मिळालं पण घेतलं नव्हतं.. आणि अशा रीतीने एकटा वालचंदात दाखल झालेलो मी. पूर्णपणे नव्या शहरात जिथे आधी कधीही आलो नव्हतो..कॉलेज ऍडमिशन .. मग हॉस्टेल.. D4.. माझे अतरंगी रूममेट्स लातूरहून आलेला श्यामू..नागपूरचा उप्या.. रूमवरच्या पहिल्या दिवशी श्यामू बरोबर केलेला नाश्ता.. निल्या सगळ्या रूम्समध्ये जाऊन ओळखी करून घेत होता..दिवसभरात तशा ओळखी होऊन गेल्या…डावीकडे फलटण गॅंग (असंच म्हणायचो आम्ही पार अगदी लास्ट इयरपर्यंत ) - सुम्या, निखल्या, बारकू, स्वप्न्या ननावरे….पलीकडं पव्या, आज्या, तुषा… मग चेतन, सुम्या लोंढे, स्वप्न्या नवघन, मक्या… उजवीकडे खत्र्या रूममेट्स - अभ्या, नावेद, शैलेश, संदेश… जिन्याच्या पलीकडे योग्या, अमल्या आणि आडम …सारंग, सिंगर मंदार.. अश्विन…मग फॅरी, बनक्या, गात्या…निल्या, केद्या आणि जग्गू…शेवटी निराली आणि भिवस्कर… सगळं अगदी क्षणात नजरेसमोरून गेलं…

     त्या दिवसानंतर ५-६ दिवस होतो हॉस्टेलवर …सबमिशन खरडल्यासारखी स्लॅमबूक भरली अक्षरशः सगळ्यांनी :)  


     एव्हाना ….कितीही इच्छा नसली तरी हळूहळू बॅगा भरू लागल्या. ३ तारखेला पहिली लातूरहून गाडी आली श्यामची…संध्याकाळी ज्योतिबाला  जाऊन आलो.. रात्री E4 ची पार्टी झाली..

आणि सकाळी तो नकोसा क्षण आला.. श्यामू आणि मह्या लातूरला निघाले..सगळ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला… कुणाची इच्छा नव्हती सोडून जाण्याची .. पण 'कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी निघावं तर लागणारंच…'  आणि एक-एक करून सगळ्यांनी परतीच्या वाट धरायला सुरु केली. माझं मन अजूनही धजवेना..रिकाम्या खोल्यांतून डोकावून बघत होतो..सवयीनं चहा-नाष्ट्याला जाताना हाका मारत होतो... आता लिहितानाही डोळे ओले होतायत.. अक्षरं धूसर होतायत.. आज-उद्या करत ६ जूनला निघायचा दिवस ठरला, जेव्हा मला वाटतं .. सुम्या, सुह्या, योग्या, विज्या, पद्या होते ... फार फार तर  अजून ४-५ जण असतील..सकाळीच सगळं सामान बांधून पॅक होतं. उगाचच कॉलेज मध्ये.. लायब्ररीपाशी ..हॉस्टेल कॅम्पस पाशी घुटमळत होतो...स्टडी रूमपेक्षा कैकपटीनं जिथं जास्त वेळ घालवला .. ते D3-4 ग्राउंड..D8 समोरचं ग्राउंड...कॉलेज मुख्य ग्राउंड ... सगळं मन भरून बघून घेतलं..रूमवर येऊन गळाभेटी घेऊन...कॉलेजचा आणि सांगलीचा निरोप घेतला.. 

         खरं सांगायचं तर..हे लिखाण मला मागेच थांबवायचं होतं, पण पेन ठेवू वाटत नव्हता..  आणि लिहीत राहिलो..ह्या शेवटच्या ५-६ दिवसांत ..काय काय ठरवल होतं..वर्षातून एकदा कॉलेजला यायचंच.. वरचेवर ट्रिप्स काढायच्या..पण....वर्षातून एकदा तर दूरंच ह्या जगरहाटीत सगळे असे अडकलो कि  २०१० ते आजवर(२०२३) मध्ये ३-४ वेळा जाणं झालं असेल कॉलेजला.. सगळ्यांचं मिळून Get-Together दूर पुण्यातल्या पुण्यात भेटणं कमी झालंय...असो थांबतो आता..अजूनही पुन्हा ते क्षण अनुभवायचे आहेत .. मनसोक्त गप्पा मारत..पोटभरून हसायचंय...बघू जमेल... 

         लास्ट इयरला असताना गौरव डागांवकरचं गाणं आलं होतं..ते तेव्हाही इमोशनल करायचं आणि आजही तितकंच रडवतं…शब्द अगदी मनाला भिडतात 🥺

" कब मिलेंगे नजाने हम, यारों फिर से सभी 

लौट कर अब ना आयेंगे वो मस्ती भरे दिन कभी…

हो दिल ये अपना काही कि ऐ दोस्तो...

I'm really gonna miss this place,  I'm gonna miss my college days

I'm really gonna miss this place,  I'm gonna miss my college days


याद है वो सारे लेक्चर्स,  हमने जो बंक किये थे

प्रॉक्झी का पकडा जाना, हो लफडे क्या काम किये थे 

मिलके लिखना वो जर्नल्स, और सबमिशन्स लास्ट मिनीट पे 

exams कि वो तैयारी, हो लिखना वो ३ घंटे 

और बाहर आ के वो कहना, साला क्या बेकार पेपर सेट किया था यार 

मिलता फर्स्ट क्लास कभी यहाँ, तो लगती थी KT कभी  

लौट कर अब ना आयेंगे वो मस्ती भरे दिन कभी  

हो दिल ये अपना काही कि ऐ दोस्तो...

I'm really gonna miss this place, i am gonna miss my college days

I'm really gonna miss this place, I'm gonna miss my college days


याद आयेंगे टीचर्स हमको दिल से हमेशा

याद आयेगा ये कॅम्पस और इसकी अपनी दुनिया

हो याद आयेगा..हमेशा ये आशियां 

I'm really gonna miss this place, I'm gonna miss my college days

I'm really gonna miss this place, I'm gonna miss my college days

I'm really gonna miss this place, I'm gonna miss my college days

I'm really gonna miss this place, I'm gonna miss my college days"


7 comments:

  1. Ewww....Junya athavan tajya kelya mitara👍👍 kharach ajun hi college che photo kiva sanglit alyavar college pasun gelyavar junya athavni ne man bharun yet

    ReplyDelete
  2. Superb! Keep writing ✍️:)

    ReplyDelete
  3. Khup chaan Mitra,keep writing,Thank you

    ReplyDelete
  4. Excellent my friend 👏👏

    ReplyDelete
  5. Khup sundar lihilay…shevatchya 2-3 Divasanchya aathavani wachtana dole bharun aale. Keep writing the good stuff!!!

    ReplyDelete
  6. Waah waah... सुंदर लिखाण... सुंदर आठवणी

    ReplyDelete