Friday, December 16, 2011

भिजून गेला वारा..Bhijun gela wara Lyrics

भिजून गेला वर,रुजून आल्या गारा..
बेभान झाली हवा ,पिऊन पाऊस ओला...||
ये ना जरा तू, ये ना जरा..
चाहूल हलकी दे ना जरा..
ये ना जरा तू , ये ना जरा..
चाहूल हलकी दे ना..आआ....

Say with you love me,love me
Say with you love me,say
Say with you love me,love me ...
Say with you love me..
 (भिजून गेला ...पाऊस ओला..)

झिम्माड पाऊस तू नको जाउस,चुकार ओठ हे बोले...
श्वासात थरथर सरीवरी सर ,मन हे आतुर झाले....(२)
ये ना  जरा तू ये ना जरा..
मिठीत हलके घे ना जरा...
ये ना जरा तू ये ना जरा...
मिठीत हलके घे ना ...आआ ||
(भिजून गेला...चाहूल हलकी दे ना...)

Say with you love me...
Say with you love me...
Say with you love me...

स्पर्शात वारे वेडे पिसारे,आभाळ वाहून गेले..
तुझ्यात मी अन माझ्यात तू बस दोघात जग हे न्हाले...हो हो ..(२)
ये ना जरा तू, ये ना जरा..
मिटून डोळे घे ना जरा..
ये ना जरा तू,ये ना जरा..
मिटून डोळे घे ना...आआ ||
(भिजून गेला...चाहूल हलकी दे ना...) 

(चित्रपट : इरादा पक्का
गीतकार : अश्विनी शेंडे 
संगीतकार : निलेश मोहरीर
गायक : क्षितीज तारे,निहिरा जोशी )

गाण्याच्या व्हिडिओकरता इथे क्लिक करा

Wednesday, September 07, 2011

"अण्णा हजारे आप आगे बढो ...हम तुम्हारे साथ हैं....???"

              गेल्या ३-४ महिन्यांपासून 'अण्णा हजारे' नावाचं वादळ सा-या भारतभर पसरलंय..भारतातच का ..अगदी BBC ची हेडलाईनही अन्नांवरून असतेय.केंद्र सरकारने (काँग्रेस व घटक पक्ष) जे काही लोकपाल विधेयक सादर केलंय त्या विरोधात 'अण्णांचं' पाऊल आहे.सगळा देश भ्रष्टाचाराने पोखरला गेलाय,त्यात हे विधेयक म्हणजे मदत करणारे आहे.
             तर ह्या सरकारी विधेयका व्यतिरिक्त 'टीम अण्णा'  (अण्णा, किरण बेदी, अरविंद केजरीवाल, न्या.हेगडे ,शांती भूषण आणि प्रशांत भूषण) यांनी मिळून 'जन लोकपाल' विधेयक सरकारपुढे सादर केलंय..अर्थातच त्यातून सर्वांनी भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न केला.आणि ह्या विधेयकाला सरकारने सरळ सरळ बगल देवून आपलं विधेयकच संसदेत मांडलं व आधी बोलल्याप्रमाणे अण्णांनी 'उपोषणाचा' इशारा दिला.त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्या आपणास माहिती आहेतच. 'अण्णा',एक ७४-७५ वर्षांचा माणूस अख्ख्या देशासाठी उपोषणास बसतो हे पाहून भारतभरातून त्यांना प्रचंड प्रमाणात पाठींबा मिळाला..मिळायलाच हवा.मोठमोठे मोर्चे Rally  निघाल्या.पुण्यातही दि.१८ ऑगस्ट ला Candle March झाला.त्याचा अनुभव...
           १७ ऑगस्टला रात्री माझा मित्र प्रण्या आणि मी जंगली महाराज रोडला बालगंधर्व समोरच्या तंबूकडे गेलो होतो.तेव्हा कळलं होतं कि,१८ ला Candle March निघणार आहे,संध्याकाळी ६ ते ८ बालगंधर्व ते सारसबाग.आमचंही जायचं ठरलं .१८ ला ऑफिसमधून रूमवर पोहोचेपर्यंत ७ वाजले,रूमवर प्रण्या,स्वप्न्या आणि त्यांचे दोन मित्र आणि मी आम्ही जमलो होतो.कुणाच्या तरी मित्राकडून कळलं कि 'March सारसबागेत पोहोचला'.आम्ही थेट सारसबागेत जाण्याचा निर्णय घेतला मग सारसबागेत आम्ही March मध्ये join झालो.
           तो Crowd पाहून भारी वाटत होतं.इतक्या प्रचंड संख्येने आलेला Crowd ,खरंच मस्त वाटत होतं.ह्या गर्दीतल्या घोषणा ऐकून जोश येत होता.'एक दोन तीन चार..बंद करो ये भ्रष्टाचार','भारतमाता कि जय','गणपती बाप्पा मोरया...जन्लोक्पाल बिल पास करा...','इन्कलाब झिंदाबाद','अण्णा हजारे सिंघम हैं....सरकार चिंगम हैं..','हम होंगे कामयाब..','अरे बघताय काय सामील व्हा...','अण्णा हजारे आगे बढो हम तुम्हारे साथ हैं..' इत्यादी इत्यादी...आणि हा crowd म्हणजे Maximum १५-३० वयोगटातील तरुण-तरुणी होते आणि घोषणा देणा-यांत मुली आघाडीवर होत्या...
           पण जसं-जसं आम्ही पुढे पुढे जात होतो..तसं-तसं मनात प्रश्न ,कपाळावर आठ्या पडायला लागल्या.
           मुला-मुलींकडील कॅमेरे दिसायला लागले..अरे,तुम्ही कुठे आलायत..काय चाललंय काय तुमचं..पुढे जसं आम्ही हिरवळीवर गेलो..तसे सर्व जन ग्रुप-ग्रुप मध्ये विभागले गेले आणि घोषणा सुरु झाल्या...आणि मग मस्तपैकी ग्रुप फोटो session ...
           अक्षरश: एका मुलाला मी बोलताना ऐकलं, " ए अरे नीट फोटो काढ,उद्या फेसबुक ला टाकायचाय "(हातात मेणबत्ती घ्यायला विसरला नाही,डोक्यावर 'मी अण्णा हजारे' असलेली गांधी टोपी घालायलाही विसरला नाही) खरंच इतका मूर्ख होता का तो....? त्याला आपण कुठे आहोत हे माहिती नव्हतं का ?खरंच त्याला फेसबुक ला प्रोफाईल फोटो टाकण्यासाठी मोर्चात सामील झाला होता का ?
           आणि Crowd मधली मुल-मुली पाहून," खरंच ह्यांना जाणवतंय का कि हा देश भ्रष्टाचाराने बरबटलाय ? खरंच ह्यांना जाणवतंय का कि भ्रष्टाचार कसा कुठे कुठे होतो ?" असे असंख्य प्रश्न पडले...
           बरेच ग्रुप 'हवा' करायला आले होते....नंतर बेकार वाटयला लागलं,खरंच आजच्या पीढीकरता वडीलधारे जे बोलतात ते खरय का ??
           असा तुमचा Support  आहे का अण्णांना ?????
           तो माणूस तिथं अन्न-पाण्याशिवाय आहे,दोन दिवस झाले...आणि तुम्हाला इथे फेसबुकला फोटो टाकायचाय...
            राहू दे..म्हटलं.सारसबागेतल्या सिद्धिविनायकाला पाया पडून निघालो...
            ह्या मोर्चातून साध्य काय काय झालं,तर एक झालं कि ' सरकारला घाबरवायला लोकांनी फक्त एकत्र येणं गरजेचं होतं...आणि ते साध्य झालं..' atleast लोक आजही एकत्र येऊन काही करू शकतात ..

Tuesday, June 21, 2011

मन उधाण वा-याचे......Man udhan varyache Lyrics

[मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते 
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते] - २
[मन उधाण वा-याचे गुज पावसाचे 
का होते बेभान कसे गहिवरते] - २ 
मन उधाण वा-याचे......

तनाना तानानानानानानानानाना उ होहोहो....


आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते
सावरते बावरते झडते अडखळते का पडते
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होवून पाण्यावरती फिरते
अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते

[मन उधाण वा-याचे गुज पावसाचे 
का होते बेभान कसे गहिवरते] - २
मन उधाण वा-याचे......

रुणझूणते गुणगुणते कधी गुंतते हरवते
कधी गही-या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे भाबडे नकळत का भरकटते

कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते

जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते
भाबडे तरी भासांच्या मागुनी पळते
[मन उधाण वा-याचे गुज पावसाचे 
का होते बेभान कसे गहिवरते] - २
मन उधाण वा-याचे......

( चित्रपट -अगं बाई अरेच्चा !!,
   गीतकार - गुरु ठाकूर,
   संगीत - अजय-अतुल,
   गायक- शंकर महादेवन )


 गाण्याच्या व्हिडिओकरता इथे क्लिक करा

Friday, June 17, 2011

He is Awesome ...

                   नाही नाही...मी सचिन तेंडूलकर बद्दल नाही बोलत ...आणि हो न कि..शाहरुख ..शाहीदबद्दल...मी बोलतोय टेनिसच्या जगताच्या ख-या राजाबद्दल...रॉजर फेडररबद्दल.....
                   Actually , तसं बघायला गेलं तर लहानपणापासून क्रिकेट सोडून दुसरा खेळ कधी पाहिलेलाच नाही,खेळण तर दूरंच......अगदीच काहीवेळा Badminton तेवढा खेळलो आहे,तोही कधी टीव्हीवर पहिला नाही...
                   एकदा रिमोटच कंट्रोल माझ्याकडे होता,सगळ्या चानेल्सवरून नेहमीप्रमाणे फिरत असताना Star Sports  ला थांबलो,टेनिसची match चालू होती विम्बल्डनची...सहजच म्हणून चानेल continue केला,म्हटलं थोडा वेळ पाहूयात..
                   थोडा वेळ पाहिलं-पाहिलं पण गुण देण्याची पद्धत काही उमजत नव्हती,
         Scoreboard वर आकडे दिसत होते ..
             ६  ६  ३० 
             १  ४  १५ ,
       आता, 
            ६  ६ 
            १  ४  ठीक...एका ठराविक   Type  मध्ये वाटतंय पण मधेच
                                        ३०       घुसडवलय....?
                                        १५ 
                   ह्या गोंधळात अजून भर पडली जेव्हा वरच्या Scoreboard  वर बदल झाला......
             ६  ६  ४०
             १  ४  १५ ,
                 जाऊ दे न ...आपल्याला काय करायचंय  ...
                २-३ दिवसांनी मी हर्ष्याला आणि रव्याला क्रिकेट खेळायला बोलवायला गेलो...'नेहमीप्रमाणे'...ते दोघे विम्बल्डनची match   पाहत होते...(त्यांना थोडं थोडं कळायचं त्यातलं) दोघांनी मला थांबवून घेतलं आणि म्हणाले,"एवढी match झाल्यावर निघू " मी आपलं clear केलं ."मला यातलं कझी काळात नाही..मी निघतो..."
                त्या दोघांनी मला थांबवून घेतलं आणि थोडेसे Concepts सांगितले आणि जी match आम्ही पाहत होतो ती होती,ग्रांडस्लाम बादशाह रॉजर फेडररची....
                खरंच माझ्यामध्ये टेनिसची आवड निर्माण करणारा तोच क्षण होता..फेडररचा खेळ पाहताना फक्त पाहतच रहावा असं वाटतं...इतक्या शांत डोक्याने खेळणारा राहुल द्रविड नंतर मी तोच पाहिला..कुठल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढळून न देणे ..अगदी स्वतःकडून काही चुका वारंवार होत असतील तरी पण शांत राहणं...पंचाचा निर्णय चुकला तरी शांत राहणे ...नाहीतर आपण मरात साफिन सारखे खेळाडू पहिले आहेत...प्रतिस्पर्ध्याकडे पाहून थुंकणे ....अम्पायर कडे पाहून काहीतरी पुटपुटणे,,,कुठलीही हद्द पार करतात..तिथे फेडरर म्हणजे दुर्मिळच...
                त्याचं अजून काय काय आवडतं म्हटलं तर,पहिल्यांदा म्हणेन ..त्याची जबरदस्त सर्व्हिस...Ultimateच...त्याची कुठलीही match घ्या,कमीत कमी दहा - एक तरी बिनतोड सर्व्हिस आपल्याला पाहायला मिळतील,मग प्रतिस्पर्धी कितीही तगडा असो...
                याशिवाय त्याची प्रतिस्पर्ध्याच्या उणीवा हेरून फटक्यांची निवड...अगदी परवाच्याच त्याच्या व जोकोविच च्या फ्रेंच ओपनच्या सामन्यात ,तो बरेचसे फटके स्लोवर मारत होता,कारण नेमका जोकोविच त्यावरच फसत होता...सही नं...त्याचा BackHand ...effortless ..कुणी पाहिला तर म्हणेल "अरे काय सहज मारतोय हा..."
                सर्वाधिक ग्रांडस्लाम मिळवणाऱ्या पीट साम्प्रास ला मागे टाकले तेव्हा अगदी डबल सेलिब्रेशन केलं..
एकतर पहिल्यांदा त्याने फ्रेंच ओपन जिंकली..आणि सर्वाधिक ग्रांडस्लाम आणि सर्व प्रकारची ग्रांडस्लाम मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जाऊन बसला.. 
                तसं त्याच्या सर्वच Matches भारी असतात पण त्याची कायम लक्षात राहणारी match म्हणजे विम्बल्डन २००८ ची नदाल बरोबरची...शप्पथ !! काय match झाली होती...अरे match कसली युद्ध झालं होतं...स्वित्झर्लंड आणि स्पेनच्या ह्या योद्ध्यांमध्ये ...सगळेच्या सगळे सेट टायब्रेकरमध्ये...डेंजर match झाली होती..
                खरतर मला नदाल बिलकुल आवडत नाही, But he was desrving that victory....त्या match मध्ये फेडररने चुका केल्या होत्या, त्याचे फटके नेटला लागून पडत होते ...तो फिट वाटत नव्हता.. हि करणे देणे योग्य नाही..
               'फेडरर best कि नदाल ' ह्यावर सारख्या चर्चा वाद होत असतात..,पण नदाल आता २५ वर्षाचा आहे आणि फेडरर ३० वर्षांचा...फेडररचा २५ वर्षांचा असतानाचा फॉर्म ,त्याचा तेव्हाचा जोश ,खेळ जो आजही त्याच्यात दिसतो...
               म्हणून म्हणावेसे वाटते ..
        "He is simply Great...He is Awesome........."
            Thursday, June 16, 2011

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..Hridayi vasant fulatana Lyrics

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..(२ )
प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे...

मोहुनिया ऐसी जाऊ नको, रोखुनिया मजला पाहू नको -(२)
गाने अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे...
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..(२ ) ||

पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली हाय हाय...
अवघी अवनी सजली धुंद मोहरली..  - (२ )
उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे,
सौख्यात प्रेम-बंधांच्या हे अंतरंग न्हावे...
हळवे तरंग बहराचे हो अंतरी भुलावे...
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे ..- (२ ) || 

मदभारा गंध हा प्रीतीचा दे गं मधुवंती हाय हाय ...
रंग तू सोड रे छंद हा मजसाठी...
हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा..
हे तीर ,चार नयनांचे देती आम्हा दिलासा...
जखमा मदन बाणांच्या मन दरवळून जावे ..||

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..(२ )
प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे...

( चित्रपट - अशी हि बनवाबनवी ,
  गीतकार -
  संगीत - अनिल मोहिले -अरुण पौडवाल,
  गायक - सुरेश वाडकर,अनुराधा पौडवाल,सचिन पिळगावकर,सुहासिनी )

गाण्याच्या व्हिडिओकरता इथे क्लिक करा

Wednesday, June 15, 2011

आभास हा..Aabhas ha Lyrics

कधी दूरदूर कधी तू समोर, मन हरवते आज का...
का हे कसे होते असे... हि आस लागे जीवा
कसा सावरू मी ..आवरू ग मी स्वतः ...
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला...
आभास हा ...आभास हा...छळतो तुला..छळतो मला....
आभास हा ..आभास हा.....|| 

कधी दूरदूर कधी तू समोर, मन हरवते आज का...
का हे कसे होते असे... हि आस लागे जीवा
कशी सावरू मी ..आवरू रे मी स्वतः ...
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला...
आभास हा ...आभास हा...छळतो तुला..छळतो मला....
आभास हा ..आभास हा.....||

क्षणात सारे उधाण वारे.. झुळूक होऊन जाती..
कधी दूर तु ही कधी जवळ वाटे..पण काहीच नाही हाती...
मी अशीच लाजते उभीच राहते पुन्हा तुला आठवते...
मग मिटून डोळे ,तुला पाहते तुझ्याचसाठी सजते...
तू नसताना असल्याचा खेळ हा...
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला..
आभास हा...आभास हा...छळतो तुला ...छळतो मला...आभास हा..आभास हा...||

मनात माझ्या हजार शंका.. तुला मी जणू कसा रे ..
तू असाच आहेस तसाच नाहीस..आहेस तू खरा कसा रे..
तू इथेच बस ना..हळूच हस ना..अशीच हवी मला तू...
पण माहित नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू...
नवे रंग सारे नवी वाटे हि हवा...
हो...दिसे स्वप्न का हे जागतानाही मला...
आभास हा...आभास हा...छळतो तुला ...छळतो मला...आभास हा..आभास हा...||

कधी दूरदूर कधी तू समोर, मन हरवते आज का...
का हे कसे होते असे... हि आस लागे जीवा
कसा सावरू मी ..आवरू ग मी स्वतः ...
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला...
आभास हा ...आभास हा...छळतो तुला..छळतो मला....
आभास हा ..आभास हा.....|| 

( चित्रपट -यंदा कर्तव्य आहे,
  गीतकार - अश्विनी शेंडे
  संगीत -निलेश मोहरीर,वैशाली सामंत,
  गायक-गायिका -राहुल वैद्य , वैशाली सामंत)

गाण्याच्या व्हिडिओकरता इथे क्लिक करा

कधी तू.....रिमझिम झरणारी बरसात..kadhi tu Lyrics

कधी तू.....रिमझिम झरणारी बरसात
कधी तू ...चमचम करणारी चांदरात
कधी तू... कोसळत्या धारा थैमाना वारा
बिजलीची नक्षी अंबरा
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात

कधी तू अंग-अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात ( २ )  
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात 
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू कोसळत्या धारा थैमाना वारा
बिजलीची नक्षी अंबरा
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम-चम करणारी चांदरात|| १ ||

जरी तू कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे विरणारे मृगजळ एक क्षणात ...( २ )
कधी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू कोसळत्या धारा थैमाना वारा
बिजलीची नक्षी अंबरा
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम-चम करणारी चांद रात

(  चित्रपट- मुंबई पुणे मुंबई
   गीतकार- सतीश राजवाडे,श्रीरंग गोडबोले
   संगीत- अविनाश-विश्वजीत
   गायक- हृषीकेश रानडे )

गाण्याच्या व्हिडिओकरता इथे क्लिक करा

Thursday, June 09, 2011

आमच्या आठवणीतला ,पहिला पाऊस...

        दिवस नेमका आठवत नाही,पण एप्रिल संपत आला होता.कारण आमच्या बी.ई. च्या लास्ट इयरच्या,लास्ट सेमिस्टर च्या इन्टर्नल ओरल्स जवळपास संपत आल्या होत्या.त्या दिवशी आमची ओरल होती;ती पण आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट कुलकर्णी सरांची.त्यात विषय होता आर्टीफ़िशिअल न्यूरल नेटवर्क थोडक्यात आपल्या मराठीत सांगायचं तर मानवनिर्मित (अनैसर्गिक ) मज्जासंस्थेचे जाळे...ज्याची ए बी सी डी पण निम्म्या क्लासला माहित नव्हती ,अर्थातच आम्हीही त्यातलेच......
        तर आमचे हे सर म्हणजे मी आधीच्या लेखात बोललो आहेच कसे आहेत...भल्याभल्या विद्यार्थी-शिक्षकांचीही टरकायची..असा त्यांचा वचक...अं.. हा..सरांच्या ओरल म्हणजे मुलांची सेमिस्टरमधल्या कर्तृत्वाची कानउघडणी असायची.अशातच भर म्हणजे आख्या क्लासमध्ये आमची बैच  कुप्रसिद्ध .बाकीचे ज्यांच्या ओरल झाल्या होत्या,त्यांचे अनुभव भयानक होते.त्यामुळे आम्ही सकाळपासून घाबरून होतो. अभ्यास काही आम्ही ओरल्सना जन्मात केला नव्हता,पण सरांचा म्हणून थोडा करून पहिला.त्यात सकाळपासून चांगलाच उकाडा जाणवत होता.ढकलत-ढकलत साडेचार वाजत आले..आणि अचानक सगळीकडे अंधारून आलं,अगदी सात-साडेसातचा अंधार असावा तसं...मग हळूहळू वारा सुटायला लागला....मग काय कसला अभ्यास ...गेले तासभर जे काही मनाच्या समजुतीकरता पुस्तक...सॉरी झेरोक्स हातात घेऊन बसलो होतो;तेही बाजूला झालं....आम्ही जवळपास २०-२५ जण होतो आणि हो-हो म्हणता-म्हणता असा जोरदार पाऊस सुरु झाला...
              सर्वजण लाबोरेटारीच्या बाहेर व्हरांड्यात गोळा झाले.इतर आजूबाजूचे विद्यार्थीही आमच्यात सामील झाले.अशातच गारा पडायला सुरुवात...मग काय सगळा विसर पडला ...कुलकर्णी सर..ओरल...
               पण  आजून भिजायला मात्र कुणी गेलं नव्हतं ....इतक्यात काही आमचे वर्ग मित्र-मैत्रिणी ज्यांच्या ओरल्स झाल्या ;ते अगदी एखादी लढाई जिंकून आल्याच्या आविर्भावात पावसात सामील झाले...मुली गारा गोळा करण्यात बिझी होत्या ..मुलं बिना डीजे चा गणपती डान्स करू लागली..
                आमच्या काही मित्रांनी-मैत्रिणींनी आपल्या महागड्या मोबाईलवर फोटो काढायला सुरुवात केली..मग काही आम्हाला राहवेना ...सर काय म्हणतील ?..भिजलेल्या अवस्थेत आत जायचं का ?...सारं विसरून आम्हीही भिजलो,नाचलो,गारा खाल्ल्या...
                  इतक्यात त्या गोंधळात आमचे हजेरी क्रमांक पुकारले गेले.. ८५, ८६, ८८, ८९, ९४..आम्ही पाच बहाद्दर ..आत सरांच्या केबिनमध्ये गेलो.एव्हाना लाईट गेली होती.पण सरांनी  तरीही आसनग्रहण करायला लावले...  मग  सरांनी  एक  एक  करून  प्रश्नाची  सरबत्ती  सुरु  केली ... खरतर  सर्व  काही  पूर्व  अपेक्षितच  होते..पण तरीही केबिनमधून बाहेर येताना फार वाईट वाटत होते...आम्ही आसनस्थ झाल्यापासून बाहेर प्रस्थान करेपर्यंत एकही शब्द उच्चारला नव्हता..शब्दांचा संग्रह सरांचा आहेच प्रगल्भ ...
                    पण हे दु:खही नेहमीप्रमाणे केबिनच्या बाहेर आल्यावर संपते व पुन्हा आम्ही सामील सामील झालो त्या पावसाच्या सरींत...
                     हळूहळू भूका लागायला लागल्या ..मग आमचा दंगा वळला,आमच्या मंजूनाथच्या गाड्यावर...आधीच तिथं फुल्ल गर्दी झाली होती...त्यात आमच्या २० जणाच्या घोळक्याची बेरीज झाली.सर्वांनी भजी-पोह्याची ऑर्डर दिली...दररोजचीच पोहे आणि भजी खाणारे आम्ही,त्या पावसात मात्र भजी-पोह्याची चव काही औरच लागत होती...मग त्यानंतर चहाचा भुर्रका घेताना ..आहा काय मजा आली..काय सांगू...   
                      तिथून मग आमचा ग्रुप निघाला हॉट-फेवरेट स्पॉटला ,लायब्ररीच्या समोरच्या कट्ट्यावर..आमच्या समोरच कौलेजच्या मुला-मुलींचा मोठा ग्रुप पाय-यांवर बसला होता. कुणीतरी आधीच होस्टेलवरून डिजिटल कॅमेरा मागवला होता...तो पण आला..मग काय सुरु फोटो काढायला..ह्या ठिकाणी-त्या ठिकाणी ....   
                       बराच वेळ पाऊस सुरु होता..खरतर जोर कमी झाला होता.पण रिपरिप सुरु होती...दंग्यात मात्र काही फरक पडला नव्हता.मग हळूहळू आम्ही पाऊले होस्टेलकडे उचलायला सुरु केली..वाटेत बरेच आमचे होस्टेलवरचे मित्र घोळक्या-घोळक्याने येत होतेच..पण पाऊस पूर्णपणे थांबेपर्यंत आमच्यापैकी कुणीही आत रुममध्ये गेलं नव्हतं...
                       सांगलीत खरंतर ४ पावसाळे पहिल्या वर्षापासून-शेवटच्या वर्षापर्यंत अनुभवले पण ह्या पावसाचा अनुभव औरच होता..आजही पाऊस आला कि,सर्व ते पावसात भिजतानाचे क्षण, केबीनमधले ओरलचे क्षण, होस्टेलवर भिजून गेल्यावर थंडीत रुममध्ये वाटणारी ऊब...अगदी आजही तशीच वाटते...   

Tuesday, May 10, 2011

उधळीत शतकीरणा उजळीत जनहृदया

उधळीत शतकीरणा उजळीत जनहृदया
नभात आला रे प्रभात रवी उद्या
तिमिराची रजनी गेली रे गेली लया || धृ ||

थरकती चंचल जललहरी
नटली सजली वसुंधरा
मधुमय मंगल स्वरलहरी
चढल्या भिडल्या दिघन्तरा
धीन्धींधींता धीन्धींधींता
दुन्धुभीच्या नादासंगे
अंबरच्या मंदिरात मंद वाजे सनई
जयजय बोला जयजय बोला
कोटीकोटी कंठानि
भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी
रे संपली ती शर्वरी, ये हा रवी या अंबरी..||१||

चलकरी वंदन नवयुवका
गगनी विलसे नवा रवी
तुझसी न बंधन जरी पथिका
दिसली तुजला दिशा नवी
दिरदिरदारा दिरदिरदारा
प्राण आता झंकारती
तारुण्याच्या सामर्थ्याला
कारुण्याची साथ देई
या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे
पौरुषाला विक्रमाला वैभवाचे हाथ देई
ही प्रार्थना,ही कामना,ही भावना,ही अर्चना ||२||  

(हे गाणे मला खूप आवडते..
आम्ही शाळेत असताना समूहगीत स्पर्धेत आमच्या वर्गाने हे म्हटले होते..
आमच्या श्री.कुंभार सरांनी हे बसवले होते..
मी इन्टरनेट बरेच  शोधले पण जास्त माहिती उपलब्ध होवू शकली नाही...गाण्याबद्दल कुणाला काही माहिती असल्यास..ती माहिती पोस्ट करा..)

Friday, May 06, 2011

एक वही झिंदाबाद

                     पहिल्या प्रयत्नामध्ये जरा सबमिशन बाबत एक आठवण सांगितली होती,ह्यावेळी मला 'एक वही झिंदाबाद'  फोर्म्युल्याबद्दल  सांगायचय...यामध्ये नवीन काहीं नाही पण प्रसंग मजेशीर आहे...म्हणून जरा लिहावासा वाटला...
                   पुन्हा हा प्रसंगही पिजेके सरांच्या तासालाच घडला आहे...खरेतर पिजेके सर म्हणजे असं व्यक्तीमत्व,'ज्यांना विद्यार्थ्याच्या वर्गातील अस्तित्वापासून...ते विद्यार्थी बसतात कुठे....ते नोट्स लिहून घेतात कि नाही ...घेतात तर कुठे लिहून घेतात ह्या सा-याबद्दल जाणून घ्यायचं असत...'
                    तस्स बघायला गेलं तर विद्यार्थी एका वहीत सगळ्या विषयांचं लिहून घेतात..ते पण कसंही...पण आमच्यामधल्या एका मित्राला हा एक वही फॉर्म्युला तर वापरायचा होताच पण त्याला सगळ्या विषयांचा track ठेवायचा होता.. मग पठ्ठ्यान काय करावं,,,त्यानं पिजेके सरांचा विषय सुरुवातीपासून लिहायला घेतला...मग वहीच्या निम्म्यातून पुढे दुसरा विषय सुरु केला...मग वही केली उलटी आणि शेवटापासून तिसरा विषय घेतला..आणि हाईट म्हणजे निम्म्यातून उलट्या बाजूने चौथा विषय सुरु केला..
                    
जस्स कि मी वर सांगितलंय,पिजेके सर विद्यार्थ्यांच्या वह्यांबद्दल particular आहेत....त्या मित्राच्या दुर्दैवानं,सरांनी अचानक वह्या चेक करायला सुरु केलं आणि तो सापडला...सरांनी त्याला मग असा फैलावर घेतला कि बस्स...असे एक-एक नवनवीन मराठी शब्द आम्हाला ऐकायला मिळाले कि काय सांगावं.....हा सगळा प्रकार अगदी अर्धा-पाऊण तास चालला होता....त्या मित्राला खूपच ओशाळल्यासारखे झाले पण आमची चांगलीच करमणूक झाली....अर्थातच आम्ही ती खूप एन्जॉय केली... 

पहिला प्रयत्न

कॉपी-पेस्ट मेथड पडली महागात
अनिकेत चिनके, बारामती
सबमिशनसाठी चाललेली धावपळ सगळ्यांनाच माहिती आहे. जरनल्स लिहिताना इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जेव्हा जर्नल्स लिहायला घेतात, तेव्हा त्यांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातले काही प्रसंग भयंकर... तर काही फारच "फनी' असतात. असेच अनुभव मलाही आले आहेत. त्यातला एक अनुभव शेअर करत आहे. आता तो कुठल्या कॅटेगरीत येतो, ते तुम्हीच ठरवा...

मी सांगलीतील वालचंद कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करत होतो. मलाही सगळ्याच विषयांची जर्नल्स सबमिट करायची वेळ आली होती. त्यामुळे मी मित्रांबरोबर एएनएनचं जर्नल लिहायला बसलो होतो. पूर्णपणे "कॉपी-पेस्ट' मेथड वापरत होतो. अजून टेक्‍निकल शब्द फारसे माहीत नव्हते. कॉपी-पेस्ट करताना अनेक टेक्‍निकल शब्द कळत नव्हते. त्यांचे अर्थ मी मित्रांना विचारायला सुरवात केली. मित्रांनी एका वाक्‍यात उत्तर दिले, ""तू आपली "कॉपी-पेस्ट मेथड' वापर. जर टेक्‍निकल शब्द आला, तर तो सिम्बॉल समजून पेस्ट करून टाक.'' मी त्यांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन केलं. त्यानंतर झालेली फजिती आठवली, की मात्र हसू येते.

कॉलेजमध्ये गेलो. टीचरनी माझं जर्नल तपासायला सुरवात केली आणि मला बरोबर पकडलं. त्यांनी मला त्यादिवशी नेमके टेक्‍निकल शब्दांचे अर्थ विचारले. मी "कॉपी-पेस्ट' मेथड वापरल्यामुळे मला एकाही शब्दाचा अर्थ माहिती नव्हता. त्यामुळे टीचरनी सगळ्या वर्गासमोर माझा चांगलाच समाचार घेतला. हा प्रसंग मी आयुष्यभर विसरू शकत नाही....