Tuesday, December 10, 2013

सर सुखाची श्रावणी..Sar Sukhachi Shravani Lyrics

गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा ।।

सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
खेळ हा तर कालचा…खेळ हा तर कालचा… पण आज का वाटे नवा
कालचा हा खेळ बघ वाटे नवा ।।

बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
वाटतो आता…वाटतो आता…उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा
उंबऱ्यापाशी उन्हाच्या चांदवा ।।

 चित्रपट :- मंगलाष्टक वन्स मोअर
 गीतकार :- गुरु ठाकूर
 संगीत :- निलेश मोहरीर
 गायक-गायिका :- अभिजित सावंत, बेला शेंडे

एका लग्नाची तिसरी गोष्ट .. Eka Lagnachi Tisari Gosht Lyrics


नं नं नं न न न ना नं नं नं न न न ना
नं नं नं न न न ना ना ना ना ना ।।
प्रेमात रंगल्या प्रेमाच्या आभाळी
प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला…
प्रेमाने मिटती मनाची अंतरे
प्रेमाला प्रेमाने पाहू चला…
नं नं नं न न न ना नं नं नं न न न ना
नं नं नं न न न ना ना ना ना ना ।।
मनाशी बोलते जगाला जोडते
प्रेमाने जागते प्रेम नवे…
प्रेमाच्या कुपीत नात्याचे गुपित
प्रेमाला ठावूक प्रेम हवे…
प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला ….
नं नं नं न न न ना  नं नं नं न न न ना
नं नं नं न न न ना ना ना ना ना ।।
प्रेमाच्या प्रवाही प्रेमाचे भोवरे
प्रेमाची वादळे येती जरी…
प्रेमाच्या लाटा ह्या प्रेमाने वाहून
प्रेमाच्या तीराशी नेती तरी
प्रेमाचा चांदवा झरतो बेभान प्रेमाचे उधाण झेलू चला…
नं नं नं न न न ना नं नं नं न न न ना
नं नं नं न न न ना ना ना ना ना।।

मालिका :- एका लग्नाची तिसरी गोष्ट
गीतकार :- संदीप खरे
संगीत :- सलिल कुलकर्णी
गायक-गायिका : सचिन पिळगावकर, अंजली कुलकर्णी

Wednesday, October 30, 2013

किल्ले राजगड मुक्कामी ट्रेक- एक भन्नाट अनुभव - २


            पहिल्या पार्टसाठी  

      पहाटे परत आजूबाजूच्या कलकलाटाने ५.३०-५.४५ ला जाग आली,सहाजणांपैकी पाचजणच होतो. बालटे गायब होता. तो 'फिरायला' गेला होता सकाळ-सकाळी ;)… हळूहळू सर्वजण उठलो आणि मंदिराबाहेर आलो. बाहेर काही तितकंसं उजाडलं नव्हतं. पण ब-याच दिवसांनी भल्या पहाटे (?) उठल्याचा अभिमान सगळ्यांना वाटत होता. पण जे वातावरण तयार झालं होतं ते फक्त आणि फक्त अवर्णनीयच होतं…मस्त धुकं पडलं होतं…उगवतीला फिकट तांबूस रंगाच्या छटा तयार झाल्या होत्या…खाली दिसणा-या गावातील रात्रीचे लुकलुकणारे दिवे अजून पूर्णपणे मालवले नव्हते …एकंदरीत एक रोमांटिक वातावरण तयार झालं होतं.


                इकडे-तिकडे फिरत…फोटो काढत वेळ जात होता…आणि जशी त्याची जाणीव झाली तसा मी सर्वांच्या भावनांना आवर घालायला लावून आवरायला सांगितलं. सर्वांनी आपापले प्रात:विधी उरकून होईपर्यंत ६.३०-६.४५ झालेपण.अर्थात अंघोळीचा काही प्रश्नच नव्हता…रात्री ज्या काका-काकूंकडून पिठलं-भाकरी खाल्लं होतं ते सकाळीही पोहे आणि चहानिशी तयार होते. सर्वांनी ब-यापैकी नाष्टा केल्यावर आम्ही पद्मावतीच्या पाया पडून मुक्कामाची ती जागा सोडली…सूर्योदय झाला होता…त्या उगवत्या सुर्यनारायणाला नमन करून पुढचा प्रवास सुरु केला तो सुवेळा माचीच्या दिशेने…गडावरच्या पायवाटा धुंडाळत वेगवेगळी रानफुले पाहत आम्ही सुवेळा माचीच्या दिशेने चालत होतो…जवळपास २-३ किमीचा प्रवास झाल्यावर आम्ही सुवेळा माचीला पोहोचणार होतो. जात असताना अधून-मधून थांबत पुन्हापुन्हा मागे वळून पद्मावती माचीकडे पाहू वाटत होतं ,वाटेत दिसणारे अक्राळ-विक्राळ खडक…डोंगर पाहत होतो…ज्या नेढ्याबद्दल मी एवढा Excite होतो तेही ह्याच वाटेवर होतं पण मला काही कुठे अजून दिसलंच नव्हतं. अधूनमधून थांबत मंडळींचे फोटो काढत होतो..एखादा माझाही येत होता… अखेर सुवेळा माचीच्या शेवटच्या टोकाला पोहोचलो. तिथून जे दृश्य दिसत होतं ते इतकं सुंदर होतं कि बस्स…अप्रतिम !!! काहीशा कमी उंचीच्या पण दूर पसरत गेलेल्या डोंगररांगा …. आणि समोर भाटघर धरणाचा जलाशय…सूर्यदेवही त्याच बाजूला वर येत होते…जवळपास ८-८.१५ झाले असतील …त्यामुळं कोवळी सूर्यकिरणे आणि अंगावर येणारा वारा झेलत त्या ठिकाणी बराच वेळ कुणाशी काही न बोलता मी फक्त उभा राहिलो. तो निसर्ग डोळेभरून पाहू कि कॅमे-यात साठवू असं झालं होतं अक्षरश: मला…. फक्त पाहतंच राहावं …उजव्या बाजूला एक किल्ला दिसत होता.. रोहीडाच असावा बहुधा…
            माघारी येताना सुम्याला वाटेत नेढ दिसलं…आम्ही जाताना तिथूनच गेलो होतो पण किंचित उंचीवर असल्यामुळे ते कळलं नव्हतं… सगळेजण नेढ्यात जाउन बसलो … हे नेढ म्हणजे…अं..समजा डोंगराची कडा जर भिंत धरली तर हे नेढ म्हणजे त्या भिंतीला असणारी खिडकी… :) तिथली १५-२० मिनिटं म्हणजे मस्त होती…एकएक नवीन अनूभव आम्ही घेत होतो.पटापट फोटो काढून घेतले आणि माघारी निघालो…सुम्या,सुशा आणि मी सोडून इतर तिघे आधी राजगड आले नव्हते त्यात विज्याने बालेकिल्ला पहायचा आग्रह धरला …बाकीच्यांनीही हो मध्ये हो मिसळल्यामुळे मग वर बालेकिल्ल्यावर जायचं ठरलं. सुशा तेवढा नको म्हणाला, मग त्याला तिथंच bag सांभाळायला बसवून आम्ही बालेकिल्ल्यावर निघालो. त्यापूर्वी पद्मावतीवरच्या गोड,स्वच्छ आणि थंड पाण्याच्या टाकीतून सर्व बाटल्या भरून घेतल्या. ती टाकी नसती तर खरोखरंच गडावर येणा-यांचे हाल झाले असते…कारण जरी  गडावर बरीच तळी-टाक्या असल्या तरी त्यातल्या त्यात फक्त हीच टाकी गडावर येणा-यांची तहान भागवते … 
               बालेकिल्ला फिरून परतेपर्यंत १०.३०-१०.४५ झाले… प्लानची अक्षरश: वाट लागली होती.माझ्या मूळ प्लाननुसार ९ला संजीवनी माचीच्या दिशेने निघायला पाहिजे होतो,पण निघेपर्यंत ११ झाले…आता लक्ष्य होतं लवकरात लवकर संजीवनी माची गाठायची,आणि अळू दरवाजा शोधायचा…जाताना वाटेत पिवळ्या फुलांचे  गालिचे पसरलेले दिसत होते…मोठमोठाले  बुरुज पार करत आम्ही संजीवनी माचीकडे चालत होतो…भरपूर पायपिटी नंतर जेव्हा संजीवनी माचीचा शेवटचा बुरुज आला आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला…पण शेवटच्या टोकापर्यंत कळलं इथं तर उतरायला मार्गच नाही आणि जो अळू दरवाजा आम्ही शोधत होतो तो ब-याच शोधाशोधीनंतरही सापडत नव्हता.जवळपास अर्ध्या-पाउण तासानंतर अखेर अळू दरवाजा सापडला.छोटासाच दरवाजा होता. तिथून बाहेर पडल्यावर एक अरुंद वाट त्या माचीला वळसा घालून उतरत होती आणि तोच होता राजगड-तोरणा ट्रेकचा मार्ग. आम्ही हळूहळू राजगड उतरायला सुरुवात केली…वाट तशी फार अवघड नव्हती पण सोपीही नव्हती. उतरताना उजव्या बाजूला गर्द झाडी तर डाव्या बाजूला खोल दरी होती.एकएक टेकडी चढत-उतरत…कधी गर्द झाडीतून कधी उघड्या माळावरून आमचा प्रवास चालू होता.एके ठिकाणी तर बालटे बंधूंना हिरव्या सर्पाच दर्शन झालं.मी सर्वात मागे असल्यामुळं मला काही क्लिक करायला मिळाला नाही. पण त्या दर्शनानं आमची जर का होईना टरकली…