Tuesday, May 10, 2011

उधळीत शतकीरणा उजळीत जनहृदया

उधळीत शतकीरणा उजळीत जनहृदया
नभात आला रे प्रभात रवी उद्या
तिमिराची रजनी गेली रे गेली लया || धृ ||

थरकती चंचल जललहरी
नटली सजली वसुंधरा
मधुमय मंगल स्वरलहरी
चढल्या भिडल्या दिघन्तरा
धीन्धींधींता धीन्धींधींता
दुन्धुभीच्या नादासंगे
अंबरच्या मंदिरात मंद वाजे सनई
जयजय बोला जयजय बोला
कोटीकोटी कंठानि
भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी
रे संपली ती शर्वरी, ये हा रवी या अंबरी..||१||

चलकरी वंदन नवयुवका
गगनी विलसे नवा रवी
तुझसी न बंधन जरी पथिका
दिसली तुजला दिशा नवी
दिरदिरदारा दिरदिरदारा
प्राण आता झंकारती
तारुण्याच्या सामर्थ्याला
कारुण्याची साथ देई
या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे
पौरुषाला विक्रमाला वैभवाचे हाथ देई
ही प्रार्थना,ही कामना,ही भावना,ही अर्चना ||२||  

(हे गाणे मला खूप आवडते..
आम्ही शाळेत असताना समूहगीत स्पर्धेत आमच्या वर्गाने हे म्हटले होते..
आमच्या श्री.कुंभार सरांनी हे बसवले होते..
मी इन्टरनेट बरेच  शोधले पण जास्त माहिती उपलब्ध होवू शकली नाही...गाण्याबद्दल कुणाला काही माहिती असल्यास..ती माहिती पोस्ट करा..)

Friday, May 06, 2011

एक वही झिंदाबाद

                     पहिल्या प्रयत्नामध्ये जरा सबमिशन बाबत एक आठवण सांगितली होती,ह्यावेळी मला 'एक वही झिंदाबाद'  फोर्म्युल्याबद्दल  सांगायचय...यामध्ये नवीन काहीं नाही पण प्रसंग मजेशीर आहे...म्हणून जरा लिहावासा वाटला...
                   पुन्हा हा प्रसंगही पिजेके सरांच्या तासालाच घडला आहे...खरेतर पिजेके सर म्हणजे असं व्यक्तीमत्व,'ज्यांना विद्यार्थ्याच्या वर्गातील अस्तित्वापासून...ते विद्यार्थी बसतात कुठे....ते नोट्स लिहून घेतात कि नाही ...घेतात तर कुठे लिहून घेतात ह्या सा-याबद्दल जाणून घ्यायचं असत...'
                    तस्स बघायला गेलं तर विद्यार्थी एका वहीत सगळ्या विषयांचं लिहून घेतात..ते पण कसंही...पण आमच्यामधल्या एका मित्राला हा एक वही फॉर्म्युला तर वापरायचा होताच पण त्याला सगळ्या विषयांचा track ठेवायचा होता.. मग पठ्ठ्यान काय करावं,,,त्यानं पिजेके सरांचा विषय सुरुवातीपासून लिहायला घेतला...मग वहीच्या निम्म्यातून पुढे दुसरा विषय सुरु केला...मग वही केली उलटी आणि शेवटापासून तिसरा विषय घेतला..आणि हाईट म्हणजे निम्म्यातून उलट्या बाजूने चौथा विषय सुरु केला..
                    
जस्स कि मी वर सांगितलंय,पिजेके सर विद्यार्थ्यांच्या वह्यांबद्दल particular आहेत....त्या मित्राच्या दुर्दैवानं,सरांनी अचानक वह्या चेक करायला सुरु केलं आणि तो सापडला...सरांनी त्याला मग असा फैलावर घेतला कि बस्स...असे एक-एक नवनवीन मराठी शब्द आम्हाला ऐकायला मिळाले कि काय सांगावं.....हा सगळा प्रकार अगदी अर्धा-पाऊण तास चालला होता....त्या मित्राला खूपच ओशाळल्यासारखे झाले पण आमची चांगलीच करमणूक झाली....अर्थातच आम्ही ती खूप एन्जॉय केली... 

पहिला प्रयत्न

कॉपी-पेस्ट मेथड पडली महागात
अनिकेत चिनके, बारामती
सबमिशनसाठी चाललेली धावपळ सगळ्यांनाच माहिती आहे. जरनल्स लिहिताना इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जेव्हा जर्नल्स लिहायला घेतात, तेव्हा त्यांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातले काही प्रसंग भयंकर... तर काही फारच "फनी' असतात. असेच अनुभव मलाही आले आहेत. त्यातला एक अनुभव शेअर करत आहे. आता तो कुठल्या कॅटेगरीत येतो, ते तुम्हीच ठरवा...

मी सांगलीतील वालचंद कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करत होतो. मलाही सगळ्याच विषयांची जर्नल्स सबमिट करायची वेळ आली होती. त्यामुळे मी मित्रांबरोबर एएनएनचं जर्नल लिहायला बसलो होतो. पूर्णपणे "कॉपी-पेस्ट' मेथड वापरत होतो. अजून टेक्‍निकल शब्द फारसे माहीत नव्हते. कॉपी-पेस्ट करताना अनेक टेक्‍निकल शब्द कळत नव्हते. त्यांचे अर्थ मी मित्रांना विचारायला सुरवात केली. मित्रांनी एका वाक्‍यात उत्तर दिले, ""तू आपली "कॉपी-पेस्ट मेथड' वापर. जर टेक्‍निकल शब्द आला, तर तो सिम्बॉल समजून पेस्ट करून टाक.'' मी त्यांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन केलं. त्यानंतर झालेली फजिती आठवली, की मात्र हसू येते.

कॉलेजमध्ये गेलो. टीचरनी माझं जर्नल तपासायला सुरवात केली आणि मला बरोबर पकडलं. त्यांनी मला त्यादिवशी नेमके टेक्‍निकल शब्दांचे अर्थ विचारले. मी "कॉपी-पेस्ट' मेथड वापरल्यामुळे मला एकाही शब्दाचा अर्थ माहिती नव्हता. त्यामुळे टीचरनी सगळ्या वर्गासमोर माझा चांगलाच समाचार घेतला. हा प्रसंग मी आयुष्यभर विसरू शकत नाही....