Tuesday, May 10, 2011

उधळीत शतकीरणा उजळीत जनहृदया

उधळीत शतकीरणा उजळीत जनहृदया
नभात आला रे प्रभात रवी उद्या
तिमिराची रजनी गेली रे गेली लया || धृ ||

थरकती चंचल जललहरी
नटली सजली वसुंधरा
मधुमय मंगल स्वरलहरी
चढल्या भिडल्या दिघन्तरा
धीन्धींधींता धीन्धींधींता
दुन्धुभीच्या नादासंगे
अंबरच्या मंदिरात मंद वाजे सनई
जयजय बोला जयजय बोला
कोटीकोटी कंठानि
भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी
रे संपली ती शर्वरी, ये हा रवी या अंबरी..||१||

चलकरी वंदन नवयुवका
गगनी विलसे नवा रवी
तुझसी न बंधन जरी पथिका
दिसली तुजला दिशा नवी
दिरदिरदारा दिरदिरदारा
प्राण आता झंकारती
तारुण्याच्या सामर्थ्याला
कारुण्याची साथ देई
या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे
पौरुषाला विक्रमाला वैभवाचे हाथ देई
ही प्रार्थना,ही कामना,ही भावना,ही अर्चना ||२||  

(हे गाणे मला खूप आवडते..
आम्ही शाळेत असताना समूहगीत स्पर्धेत आमच्या वर्गाने हे म्हटले होते..
आमच्या श्री.कुंभार सरांनी हे बसवले होते..
मी इन्टरनेट बरेच  शोधले पण जास्त माहिती उपलब्ध होवू शकली नाही...गाण्याबद्दल कुणाला काही माहिती असल्यास..ती माहिती पोस्ट करा..)

2 comments:

  1. hi i z searching for this lyrics since long.. thnx alot!!

    ReplyDelete
  2. शेवट च एक कडव राहील आहे अस वाटत आहे

    ReplyDelete