Tuesday, July 31, 2012

चिंब भिजलेले .. Chimb Bhijalele Lyrics

ह्या रिमझिम झिरमिर पाऊसधारा
तन मन फुलवून जाती …(२)
सहवास तुझा मधुमास फुलांचा
गंध सुखाचा हाती..
हा धुंद गार वारा
हा कोवळा शहारा
उजळून रंग आले
स्वच्छंद प्रीतीचे
....................
चिंब भिजलेले रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे …(२) ||धृ ||

ओढ जागे राजसा रे अंतरी सुख बोले...
सप्तरंगी पाखरू हे, इंद्रधनू बघ आले
लाट हि, वादळी, मोहुनी गाते.. 
हि मिठी लाडकी मोगरा होते....
पडसाद भावनांचे, रे बंध ना कुणाचे..
दाही दिशांत गाणे, बेधुंद प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले, 
बरसुनी आले रंग प्रीतीचे..(२)  ||१|| 

हे फुल ओले..पंख झाले..रूप हे सुखाचे..
रोमरोमी जागले हे गीत मधुस्वप्नाचे..
बरसतो मोगरा थेंब गंधाचे..
भरजरी वेड हे ताल छंदाचे...
घन व्याकूळ रिमझिमणारा... 
मन अत्तर दरवळणारा...
हि स्वर्गमुखाची दारे..हे गीत प्रीतीचे...
चिंब भिजलेले, रूप सजलेले, 
बरसुनी आले रंग प्रीतीचे..(२)  ||२|| 

( चित्रपट- बंध प्रेमाचे
गीतकार- प्रवीण दवणे
संगीतकार- अजय-अतुल 
गायक- शंकर महादेवन, प्रीती कामत )