Sunday, July 28, 2013

तो…,ती…आणि मी… :)

         परवा फेसबुकवर Confession Box मध्ये एक Confession वाचलं, मुलीवरून दोन मित्रांमध्ये भांडण वगैरे वगैरे …तेव्हा मलाही माझ्या बाबतीत घडलेला असाच एक प्रसंग आठवला ,फक्त त्याला गंभीर म्हणावं कि विनोदी तेच कळत नाही …
          कॉलेजला प्रवेश घेतला ,घरापासून लांब होस्टेलला राहताना आपसूकच कुणीतरी आपलं जवळचं (?? :)) असावं असं वाटत असतं …त्या दृष्टीने बऱ्याच जणांचे डोळे कॉलेज मधून फिरताना कुणाला तरी  शोधत होते…रूमवर आल्यावर …एकत्र बसल्यावर चर्चा…गप्पा-टप्पा रंगत होत्या ….'हिला बघितलास काय ?' 'आयला ….त्या कॉम्पुटरलाच सगळ्या चांगल्या पोरी गेल्यात …' ,'आमच्या आयटीला सगळं वाळवंटच आहे राव …','इलेक्ट्रोनिक्स ला पण माल माल पोरी आहेत…',वगैरे वगैरे ……. मी एक असाच चेहरा निवडून ठेवला होता …. तिचं नाव 'क्ष' म्हणून घेतो… ती दिसायला सुंदर होती , चेहऱ्यावरून ती शांत वाटायची…. (म्हणजे Attitude नसलेली म्हणायचंय मला) अगदी सोज्वळ वगैरे म्हणतात न अगदी तशी …म्हणूनच मला आवडली :) …. एव्हाना तुमच्या मनात तिची इमेज तयार झाली असेलच…  ;) आणि आमच्या कॉलेज सारख्या कॉलेजमध्ये जिथे हिरवळ तशी अभावानेच असायची …… आम्ही दुष्काळ पिडीत लोक हो…. पुण्या-मुंबई सारखा सुकाळ आमच्याकडे कुठं आलाय…त्यामुळं तिच्यामागं आणखी काहीजण असण्याची शक्यता होती आणि काही दिवसातच मला त्याची प्रचिती आली .आमच्याच वर्गातल्या एका आमच्या मित्राला 'य' ला सुद्धा ती खूप आवडायची .
           आमचं जेव्हा Graphics चं Practical असायचं नेमकं त्याच वेळी 'क्ष'चं हि असायचं…. अगदी आमच्या समोरच … योग्या आणि मी बऱ्याचदा एकत्र असायचो  त्यामुळं त्याला मी तिच्याबद्दल बोललो होतो, त्यामुळं तो मला अधून मधून चिडवायचा  किंवा ती आली कि  मला खुणवायचा . ग्रुपमध्ये बाकी कुणाला बहुतेक हे माहित नव्हतं . २ऱ्या सेमिस्टरला Basic Electrical च्या प्राक्टीकलला योग्यान एकदा मोठा घोळ केला . नेहमीप्रमाणे आमचा आपला टाईमपास चालला होता आणि अचानक योग्या ' क्ष' आन्याला आवडते म्हणून बोलून गेला …मला त्यावेळी काही तितकंसं गंभीर वाटलं नाही …
           कॉलेज सुटल्यावर नेहमीप्रमाणे रूमवर आलो क्रिकेट खेळलो आणि ७ ला मेसला जाउन ८ पर्यंत सर्व उरकून परतलो .थोडा ह्याच्या त्याच्या रुममध्ये फिरून माझ्या 'नेहमीच्या' वेळेला  ८:३०-८:४५ च्या आसपास मला झोप लागली .
            मला चांगली गाढ झोप लागली होती. पण, मध्यरात्री १२-१२.३० च्या आसपास 'श्याम'नं मला गदागदा हलवून उठवलं.  मला एका अज्ञात व्यक्तीकडून फोन आला होता. त्या व्यक्तीने फोन उचलल्या-उचलल्या शिव्या द्यायला सुरुवात केली होती. सुरुवातीला काहीवेळ त्या शिव्या 'श्याम'नं खाल्ल्या आणि पुढील जवळपास ५ मिनिटे मी खाल्ल्या…. एकतर अचानक इतक्या मध्यरात्री झोपेतून फोन केला होता त्यात पलीकडची व्यक्ती नुसत्या शिव्या हासडीत होती. माझी तर complete टरकलीच… श्याम पण खडबडून जागा झाला…."का रे मुलींच्या मागं फिरायची खूप हौस आहे का ?", "अमुक-अमुक च्या मागं ह्यापुढ फिरलास तर बघ …","मार खायचा आहे का ??", वगैरे वगैरे …असं काहींसं पलीकडची व्यक्ती बोलत होती …आणि शिव्या तर बस्स .. इतक्या शिव्या मी एकत्र कधीच ऐकल्या नव्हत्या …इतक्यात मागून मला पुसटसा आवाज ऐकू आला…तो 'य'चा होता…तेव्हा माझी ट्युबलाईट पेटली…खरंतर मला काहीवेळ विश्वासच बसत नव्हता …आणि त्यात ह्या फोनवरुनच्या हल्ल्यानं पुरता हादरलो होतो मी…
           त्या घटनेनंतर मी 'क्ष'चा नाद काही प्रमाणात सोडून दिला…आणि त्यावेळी बहुतेक मी कुणाला सांगितलंहि नाही काही त्या फोनबद्दल आणि मागच्या सुत्रधाराबद्दल ;) …पुढे 'य' आणि 'क्ष' ची मैत्रीही झाली आणि वर्गातल्या ब-याच जणांनी 'य'कडून त्याबद्दल पार्टी उकळली आणि कहर म्हणजे त्यात मी सुद्धा होतो… पुढे काही 'य'ची प्रगती झाली नाही.पण सध्यातरी त्या 'क्ष'चं एका तिस-याच 'झ' बरोबर लग्न झालंय…
            'य' आणि मी आमच्या मैत्रीतही त्यामुळं काही फरक पडलेला नाही…आणि हो माझ्या जवळच्या मित्रांनी फक्त कृपया 'क्ष' आणि 'य' ची नावं विचारू नका…ज्यांना हा प्रसंग माहित आहे ,लक्षात आहे त्यानं कुणाला सांगू नका…