Thursday, June 08, 2023

आठवणीतला लोहगड ट्रेक....


              लोहगडाच्या वाऱ्या बऱ्याचदा झाल्या, फक्त लोहगड...विसापूर+लोहगड एकत्र... पण पहिल्यांदा गेलेलो तेव्हाचा अनुभव म्हणलं तर मजेशीर आणि म्हणलं तर तसा थरारक पण होता. थोडक्यातच सांगतो, आम्ही ६ जण आमल्या सातपुते, सुशा, सुम्या, सुह्या, विज्या लोकलने गेलो. मळवलीला उतरून...आधी वाटेत भाजे गावच्या लेणी पाहिल्या...

वाटेत २ ३ धबधबे लागले...५-६ किलोमीटर पायपीट करावी लागते खरी पण ऐन ऑगस्टमध्ये गेल्यामुळे सगळीकडे हिरवळ...ओढे वाहत होते त्यामुळे थकवा असा जाणवला नाही....
विज्याच तेवढं आठवतंय दोनतीनदा ग्लुकोज प्यायला लागलं होतं...बाकी पूर्णवेळ ट्रेकला मस्त मजा आली.. 

पुढे आम्ही आधी लोहगड बघितला..भक्कम दरवाजे आणि कमानी, तटबंदी,पायऱ्या, शिवमंदिर, वरचे तलाव, पाण्याच्या टाक्या, काही उध्वस्त वस्तू, उलटा धबधबा, विंचूकाटा पॉइंट...पूर्ण धुक्यातच...अधून मधून पावसाच्या सरी होत्याच सोबतीला....
तास दीडतास फिरलो वर गडावर आणि उतरून पायथ्याला गावात मस्त पिठलं आणि भाकरी...भज्यांवर ताव हाणून... २.३०-२.४५ च्या आसपास गायमुख खिंडीमार्गे विसापूरकडे निघालो. तसा unplanned च प्लॅन होता हा.. पायऱ्या उतरताना माझी काहीतरी गडबड झाली होती...पाऊल टाकताना वजन गुढग्यावर पडल्याने गुडघे काहीसे दुखू लागले....
सुह्या आणि अमल्या सगळ्यात पुढे वाट शोधत चालले होते आणि मी लक्ष ठेवत सर्वात मागे होतो.पावसाची रिपरिप चालू होतीच.एक २०-२५ मिनिटे चालल्यावर बाजूच्या जंगलातून चित्रविचित्र -भयानक आवाज यायला लागला…माकडांच्या ओरडण्याचा होता की अजून कसला काय माहिती आता…आम्हा मागच्या चौघांना पुढे सुह्या आणि आमल्या दिसत नव्हते…आणि जसा आवाज जवळपास यायला लागला तसे दोघे उलटे पळत येताना दिसले... सगळ्यांची टरकली ना…Public घाबरली आणि तश्शी उलट्या पावलांनी धावायला लागली…त्या पायाच्या नडगीपर्यंतच्या चिखलात धड कुणाला पळतासुध्दा येईना…धप्पदिशी पडल्याचा आवाज आला तो होता आम्ल्याचा…😁 तसाच ट्रेक सोडून गपगुमाने माघारी मळवलीची वाट धरली होती…
                  

No comments:

Post a Comment