Friday, October 14, 2016

PTC मधला तो शेवटचा दिवस

       कालची संध्याकाळ, साडेआठ-पाऊणेनऊ झाले असतील....थोडासा फ्लॅशबॅक.. दीपिकाचा वाढदिवस साजरा करायला कट्ट्यावर प्रविण, अशोक,नम्रता, पूजा,नेहा,लीना,दीपिका आणि मी जमा झालो होतो. केक कापला,फोटो काढले...नंतर बराच वेळ गप्पा टप्पा झाल्या..जसे जसे आठ-सव्वाआठ व्हायला लागले.. मुली घरी जायला निघाल्या..नंतर काही वेळ प्रविण ,अशोक अन मी आम्ही तिघे गप्पा मारत होतो..१५-२० मिनिटांनी प्रविण-अशोक पण निघाले..मग मी सुद्धा त्यांचा निरोप घेऊन बिल्डिंगच्या दिशेने पावलं उचलली..जसजसा मी सिक्युरिटी चेकपाशी यायला लागलो..काहीतरी विचित्र फिल व्हायला लागलं..असं उदास..भकास..काहीतरी वेगळं..एकतर ह्या वेळेला ऑफिस बिल्डिंगमध्ये कधी आलो नव्हतो..ते हि एकट्याने..असं सारखं वाटायला लागलं कशापासून तरी दूर चाललोय..हातातून काहीतरी निसटतंय.. चेकपोस्टपासून आणखी पुढं पुढं जाऊ लागलो तसं आणखी पोटात खड्डा पडायला लागला..पायऱ्या चढल्या..दुसऱ्या मजल्यावर आलो..ह्या पायऱ्या आज शेवटच्या चढल्या का? आयडी दाखवून शेवटचं आत आलो का? TT रूमकडे बघितलं..राकेश आणि पवन होते..क्षणात वाटलं चला शेवटचं PTC मधलं TT खेळावं,पण Desk वर जाऊन आवराआवर करून निघायचं होतं, So, desk कडे निघालो,तितक्यात आठवलं खाली जाण्याच्या घाईत आपण बऱ्याच जणांना न भेटताच गेलो. प्रदीप तर खास म्हणाले होते, 'निघताना न विसरता भेट' आणि मी मात्र विसरलो. Cubicle कडे वळतानाच प्रदीप दिसले,So थोडं बरं वाटलं. सायली तर नक्कीच गेली असणार..अमेय, प्राजक्ता निघालेच होते त्यांची गाठ पडली. त्यांचा  निरोप घेतला.Desk वर जाऊन बसलो,विचार करत होतो,काही Backup घ्यायचा आहे,नेहाला शेवटी काही Mails forward करायचे आहेत का..करत तर काहीच नव्हतो..उगाचच Deskपाशी घुटमळत होतो..बहुतेक तिथल्या Desk वरच्या,त्या ऑफिस मधल्या 'आठवणींचा Backup' घेत होतो...एव्हाना नऊ-सव्वानऊ झाले असावेत..पण पाय काही निघत निघेना ..ऑफिसमध्ये फक्त प्रदीप,संतोष,समीर,कृष्णा आणि उमा दिसत होते..प्रदीप ना भेटलो ..संतोषचा निरोप घेतला आणि उमा,समीर,कृष्णाशी गप्पा मारत उभा राहिलो..माझ्या Send केलेल्या Last Mail वर चर्चा झाली,पुढे कुठे जाणार वगैरे वगैरे...वाटलं असतं तर अजूनही थांबलो असतो पण कधी ना कधी निघायचं होतं.. पुन्हा desk कडे आलो..परत 'D:' drive शोधला,काही घेण्यासारखं राहिलं असेल तर...काही Photos Videos मिळाले ते Pendrive मध्ये copy करून घेतले. काही ठेवण्याची गरज नसलेल्या Files Delete केल्या आणि Outlook शेवटचं पाहून Machine Shutdown केलं आणि अखेर निघालो.PTC मधून शेवटचं ...वाटेत दरवाजात राकेश आणि पवन भेटले त्यांचा निरोप घेतला,ID submit करून.. पायऱ्यांनी Parking कडे निघालो..डोळ्यातुन पाणी यायचंच बाकी होतं.. घशाशी आलेला आवंढा गिळला..गाडी काढली आणि रूमकडे निघालो.
     ऑफिस ते रूम १५-१६ किमी च्या प्रवासात पूर्ण वेळ मनात खळबळ चालू होती. आज PTC मधला शेवटचा दिवस, सोमवारपासून आपण त्या ऑफिसला जाणार नाहीय,आपली मित्रमंडळी, आपला कट्टा, गप्पा, Walk, टपरी, TT रूम ह्या सर्वांपासून दूर...अश्विनी..तिला वाटणारा आधार..हो सगळे आपलेच आहेत तिथं..पण उगाचंच हुरहुर होती..म्हणतात ना Departs are always difficult..पण दुसरीकडे मन पटवण्याचा प्रयत्न करत होतं, 'एकावेळी आपण सगळ्याच गोष्टी तर पकडून ठेऊ शकत नाही.. काही निर्णय घेताना..पुढे जात असताना काही ना काही मागे राहत असतं, दूर जात असतं, वेगळं होत असतं!' आणि हे जे काही सध्या difficult वाटतंय पण नक्कीच ह्यावर overcome करेन. मित्र-मैत्रीणी, आम्ही वेगवेगळ्या कंपनीमध्ये असलो म्हणून काय झालं, आम्ही नक्कीच कधीही भेटू शकतो तसेच दिवस Enjoy करू शकतो
      मनात अजूनही धाकधूक,बैचेनी आहेच, पोटात पडणारा खड्डाही आहेच पण समजावतोय मनाला...
(हे सगळं १० एप्रिल २०१५ ला लिहिल होतंं)

2 comments:

  1. Bhari lihile aahes Aniket... Mast☺

    ReplyDelete
  2. PTC ahech ashi...nicely articulate ani..

    ReplyDelete