Monday, January 05, 2015

वेगळ्या वळणावर !!

                बऱ्याच आठवणी लिहून काढल्या, बरेच जुने प्रसंग आठवून लिहिले म्हटलं आता जरा थोडं वेगळं लिहावं…थोडंसं वाचना-याला विचार करायला लावणारं…खासकरून माझ्याबरोबरच्या…
                आजच्या ह्या युगात सगळ्यांना बऱ्याच गोष्टींची घाई झालीये… कुणाला नोकरीत प्रमोशनची…कुणाला कंपनी बदलायची…कुणाला Flat /घर घ्यायची … तर अजून कुणाला कशाची …ह्या ना त्या गोष्टीची  घाई आहे मात्र जरूर … आणि त्यात अगदी वावगं काय आहे म्हणा …मीही त्याला फार काही अपवाद नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय असं जाणवतंय…अगदी छोट्या-छोट्या गोष्टी…मला सांगा सोमवार-शुक्रवार ऑफिस करायचं …काही वर्कोहोलिक (Workohilic) असतात ते शनिवारीही काम करतात…नसेलच तर काहीतरी बँकेचं काम पेंडिंग असतं…नाहीतर दुसऱ्या आणखी कुठल्यातरी हाफिसात जायचं असतं…मग शनिवार असातसाच जातो…मग रविवार अर्थातच संपूर्ण आरामातच जातो…कारण सोमवार-शनिवार झोप अशी सुखाची झालेलीच नसते…मला सांगा आपल्याला ह्यात आनंद नेमका कधी मिळाला ?? Package ५-६ चं ६-७ लाख मिळालं पण परत 'Flat Book कर' चा सपाटा सुरु होतो… Investment …. Permanent १-२ BHK …सारखं सारखं कशाच्या न कशाच्या घाईत…
                आता एक विचारतो Last Time तुम्ही असंच बागेत जाऊन झाडावरच्या/वेलीवरच्या फुलाचा हातात घेऊन वास घेतलाय ? झाडावरचं फळ तोडून Direct कशी खाल्लं ? रस्त्यावरून चालत असताना Cricket खेळणाऱ्या लहान मुलांमध्ये जाऊन २ Ball टाकून batting केलीये ? घरातले सगळे मिळून बसून एखादा मस्त पिक्चर/कार्यक्रम एन्जोय केला? Shoppingसाठी कुठल्यातरी Mallच्या जंगलात जाण्याऐवजी खऱ्याखुऱ्या जंगलाच्या वाटा धुंडाळल्या ? रोजच्या सिमेंट-डांबराच्या रस्त्यावर चालण्याऐवजी मातीनं मळलेल्या वाटेवर फिरलो? डोंगर दऱ्यातून फिरलो ? कधी कुठल्या छोट्याशा टेकडीवर जाऊन मस्त सुर्योदय/सूर्यास्त पाहिला ?  हं ?
                  मला वाटतं सगळेच जण काही माझ्या बोलण्याशी सहमत नसतील…काही म्हणतील 'ह्या गोष्टी केल्या नाहीत तरी आम्हाला असं काही Miss केल्यासारखा वाटत नाही' …पण तरीही…ह्या गोष्टी कितीही लहान-सहान वाटल्या…काही वेडेपणाच्या वाटल्या…तरीही मी म्हणतो ह्या गोष्टी करून पाहूयात…अनेक गोष्टी साध्य होतील…इथे काही ह्या गोष्टी करताना तुम्हाला कुणाशी स्पर्धा नाही करायला लागणार…असं काही करताना ते काही म्हणतात न Nostalgic काहीसं वाटतं…मिळणारा आनंद तुम्ही अनुभवालच… बघू जमतंय का ? जमेलच !!! :)   

2 comments: