Tuesday, January 21, 2014

जुळून येती रेशीमगाठी...Julun Yeti Reshimgathi Lyrics

मुक्याने बोलले…गीत ते जाहले…स्वप्न साकारले…पहाटे पाहिले…
नाव नात्याला काय नवे…वेगळे मांडले सोहळे…तुजसाठी…
हो हो…मिळावे तुझे तुला…आस ही ओठी …
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी…
जुळून येती रेशीमगाठी…आपुल्या रेशीमगाठी ।।

उन्हाचे चांदणे उंब-यात सांडले…डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले…

खेळ हा कालचा..आज कोण जिंकले…हरवले कवडसे मिळून ते शोधले…
एकमेकांना काय हवे…जे हवे सगळेच आणले तुजसाठी…
कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी…
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी…
जुळून येती रेशीमगाठी…आपुल्या रेशीमगाठी ।।

मालिका :जुळून येती रेशीमगाठी

गीतकार : अश्विनी शेंडे
संगीतकार : निलेश मोहरीर 
गायक : निहीरा जोशी, स्वप्नील बांदोडकर 

3 comments:

  1. can you please post english or hindi translation of this song......

    ReplyDelete
  2. Krupaya galalela Bhag lyrics madhe add karava hi vinanti

    ReplyDelete