Saturday, September 21, 2013

देवा तुझ्या गाभा-याला उंबराच न्हाई Deva Tuzya Gabharyala Lyrics

देवा तुझ्या गाभा-याला उंबराच न्हाई…सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही …
देवा कुठं शोधू तुला मला सांग ना…प्रेम केलं येवढाच माझा रे गुन्हा ।।

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी (२)…माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या ऊरी ।
हे…आरपार काळजात का दिलास घाव तू …दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू ।।

का,कधी,कुठे …स्वप्न विरले प्रेम हरले …।। (२)

स्वप्न माझे,आज नव्याने खुलले…अर्थ सारे स्पर्शाने उलघडले ।।
आरपार काळजात का दिलास घाव तू …दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू ।।

का रे तडफड ही ह्या काळजामध्ये, घुसमट तुझी रे होते का कधी ।
माणसाचा तू,जल्म घे…डाव जो मांडला मोडू दे ।।

का हात सुटले, श्वास मिटले … ठेच लागे ।।(२)

उत्तरांना प्रश्न कसे हे पडले…अंतराचे अंतर कसे न कळले ।

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी …माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या ऊरी ।
आरपार काळजात का दिलास घाव तू …दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू ।।

(चित्रपट- दुनियादारी
 गीतकार- मंदार चोळकर
 संगीतकार- अमितराज सावंत
  गायक -आदर्श शिंदे,कीर्ती किल्लेदार)

No comments:

Post a Comment