Wednesday, February 06, 2013

ओल्या सांजवेळी...उन्हे सावलीस बिलगावी ..Olya Sanjveli lyrics

ओल्या सांजवेळी...उन्हे सावलीस बिलगावी ...तशी तू जवळी ये जरा...
को-या कागदाची कविता अन जशी व्हावी.. तशी तू हलके बोल ना..
आभाळ खाली झुके..पावलांखाली धुके.... (२)
सुख हे नवे सलगी करे ..का सांग ना............ 
ओल्या सांजवेळी...उन्हे सावलीस बिलगावी ...तशी तू जवळी ये जरा...
को-या कागदाची कविता अन जशी व्हावी.. तशी तू हलके बोल ना.. ।।

सारे जुने दुवे...जळती जसे दिवे... पाण्यावरी जरा सोडून देऊया ...
माझी हि आर्जवे..पसरून काजवे...जातील ह्या नव्या वाटेवरी तुझ्या ...
रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे...
पुसल्या जुन्या पाउलखुणा ...सोबत तुझी साथ रे...  ।।

वळणावरी तुझ्या,पाऊस मी उभा ..ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे...
डोळ्यातल्या सरी,विसरून ये घरी...ओळख आता खरी होऊन जाऊ दे...
सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला ...
मी सावली होऊन तुझी देईन साथ मी तुला .....   ।।

चित्रपट - प्रेमाची गोष्ट
गीतकार - अश्विनी शेंडे
संगीतकार - अविनाश-विश्वजित
गायक - स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे 

गाण्याच्या व्हिडिओकरता इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment