Wednesday, September 05, 2012

नटरंग ऊभा Natrang ubha Lyrics

धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट नटनागर नट हिमनट परवत ऊभा उत्तुंग नभा घुमतो मॄदुंग 
पख्वाज देत आवाज झनन झंकार लेऊनी
स्त्रीरूप भुलवी नटरंग..नटरंग..नटरंग...
रसिक होऊ दे दंग चढु दे
रंग असा खेळाला
साता जन्माची देवा पुन्याई
लागु दे आज पनाला
हात जोडतो आज आम्हाला
दान तुझा दे संग
नटरंग ऊभा ललकारी नभा..स्वरताल जाहले दंग... (२)
कड्‌कड्‌ कड्‌कड्‌ बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची
छुमछुम छ्ननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो ईच ईनंती यावं जी
किर्पेचं दान द्यावं जी ... हे यावं जी किर्पेचं दान द्यावं जी
ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर ऊपकार
तुज चरणी लागली वर्णी कशी ही करणी करु साकार
मांडला नवा सौसार आता घरदार तुझा दरबार
चेतला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग
नटरंग ऊभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग
कड्‌कड्‌ कड्‌कड्‌ बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची
छुमछुम छ्ननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो ईच ईनंती यावं जी
किर्पेचं दान द्यावं जी ... हे यावं जी किर्पेचं दान द्यावं जी ....
( चित्रपट- नटरंग
गीतकार- गुरु ठाकूर, अजय-अतुल

संगीतकार- अजय-अतुल 
गायक- अतुल गोगावले आणि कोरस )

No comments:

Post a Comment