Wednesday, September 07, 2011

"अण्णा हजारे आप आगे बढो ...हम तुम्हारे साथ हैं....???"

              गेल्या ३-४ महिन्यांपासून 'अण्णा हजारे' नावाचं वादळ सा-या भारतभर पसरलंय..भारतातच का ..अगदी BBC ची हेडलाईनही अन्नांवरून असतेय.केंद्र सरकारने (काँग्रेस व घटक पक्ष) जे काही लोकपाल विधेयक सादर केलंय त्या विरोधात 'अण्णांचं' पाऊल आहे.सगळा देश भ्रष्टाचाराने पोखरला गेलाय,त्यात हे विधेयक म्हणजे मदत करणारे आहे.
             तर ह्या सरकारी विधेयका व्यतिरिक्त 'टीम अण्णा'  (अण्णा, किरण बेदी, अरविंद केजरीवाल, न्या.हेगडे ,शांती भूषण आणि प्रशांत भूषण) यांनी मिळून 'जन लोकपाल' विधेयक सरकारपुढे सादर केलंय..अर्थातच त्यातून सर्वांनी भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न केला.आणि ह्या विधेयकाला सरकारने सरळ सरळ बगल देवून आपलं विधेयकच संसदेत मांडलं व आधी बोलल्याप्रमाणे अण्णांनी 'उपोषणाचा' इशारा दिला.त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्या आपणास माहिती आहेतच. 'अण्णा',एक ७४-७५ वर्षांचा माणूस अख्ख्या देशासाठी उपोषणास बसतो हे पाहून भारतभरातून त्यांना प्रचंड प्रमाणात पाठींबा मिळाला..मिळायलाच हवा.मोठमोठे मोर्चे Rally  निघाल्या.पुण्यातही दि.१८ ऑगस्ट ला Candle March झाला.त्याचा अनुभव...
           १७ ऑगस्टला रात्री माझा मित्र प्रण्या आणि मी जंगली महाराज रोडला बालगंधर्व समोरच्या तंबूकडे गेलो होतो.तेव्हा कळलं होतं कि,१८ ला Candle March निघणार आहे,संध्याकाळी ६ ते ८ बालगंधर्व ते सारसबाग.आमचंही जायचं ठरलं .१८ ला ऑफिसमधून रूमवर पोहोचेपर्यंत ७ वाजले,रूमवर प्रण्या,स्वप्न्या आणि त्यांचे दोन मित्र आणि मी आम्ही जमलो होतो.कुणाच्या तरी मित्राकडून कळलं कि 'March सारसबागेत पोहोचला'.आम्ही थेट सारसबागेत जाण्याचा निर्णय घेतला मग सारसबागेत आम्ही March मध्ये join झालो.
           तो Crowd पाहून भारी वाटत होतं.इतक्या प्रचंड संख्येने आलेला Crowd ,खरंच मस्त वाटत होतं.ह्या गर्दीतल्या घोषणा ऐकून जोश येत होता.'एक दोन तीन चार..बंद करो ये भ्रष्टाचार','भारतमाता कि जय','गणपती बाप्पा मोरया...जन्लोक्पाल बिल पास करा...','इन्कलाब झिंदाबाद','अण्णा हजारे सिंघम हैं....सरकार चिंगम हैं..','हम होंगे कामयाब..','अरे बघताय काय सामील व्हा...','अण्णा हजारे आगे बढो हम तुम्हारे साथ हैं..' इत्यादी इत्यादी...आणि हा crowd म्हणजे Maximum १५-३० वयोगटातील तरुण-तरुणी होते आणि घोषणा देणा-यांत मुली आघाडीवर होत्या...
           पण जसं-जसं आम्ही पुढे पुढे जात होतो..तसं-तसं मनात प्रश्न ,कपाळावर आठ्या पडायला लागल्या.
           मुला-मुलींकडील कॅमेरे दिसायला लागले..अरे,तुम्ही कुठे आलायत..काय चाललंय काय तुमचं..पुढे जसं आम्ही हिरवळीवर गेलो..तसे सर्व जन ग्रुप-ग्रुप मध्ये विभागले गेले आणि घोषणा सुरु झाल्या...आणि मग मस्तपैकी ग्रुप फोटो session ...
           अक्षरश: एका मुलाला मी बोलताना ऐकलं, " ए अरे नीट फोटो काढ,उद्या फेसबुक ला टाकायचाय "(हातात मेणबत्ती घ्यायला विसरला नाही,डोक्यावर 'मी अण्णा हजारे' असलेली गांधी टोपी घालायलाही विसरला नाही) खरंच इतका मूर्ख होता का तो....? त्याला आपण कुठे आहोत हे माहिती नव्हतं का ?खरंच त्याला फेसबुक ला प्रोफाईल फोटो टाकण्यासाठी मोर्चात सामील झाला होता का ?
           आणि Crowd मधली मुल-मुली पाहून," खरंच ह्यांना जाणवतंय का कि हा देश भ्रष्टाचाराने बरबटलाय ? खरंच ह्यांना जाणवतंय का कि भ्रष्टाचार कसा कुठे कुठे होतो ?" असे असंख्य प्रश्न पडले...
           बरेच ग्रुप 'हवा' करायला आले होते....नंतर बेकार वाटयला लागलं,खरंच आजच्या पीढीकरता वडीलधारे जे बोलतात ते खरय का ??
           असा तुमचा Support  आहे का अण्णांना ?????
           तो माणूस तिथं अन्न-पाण्याशिवाय आहे,दोन दिवस झाले...आणि तुम्हाला इथे फेसबुकला फोटो टाकायचाय...
            राहू दे..म्हटलं.सारसबागेतल्या सिद्धिविनायकाला पाया पडून निघालो...
            ह्या मोर्चातून साध्य काय काय झालं,तर एक झालं कि ' सरकारला घाबरवायला लोकांनी फक्त एकत्र येणं गरजेचं होतं...आणि ते साध्य झालं..' atleast लोक आजही एकत्र येऊन काही करू शकतात ..

1 comment: